Technology

मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही अशाप्रकारे तपासा!

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. ही निवडणूक 7 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तसेच 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Download Voter ID Card l मतदार यादीत नाव आहे की नाही तपासता येणार :

मात्र, काही लोकांना मतदार ओळखपत्राबाबत अडचणी येत आहेत. तुम्हालाही मतदार कार्डा संदर्भात काही समस्या असल्यास आता टेंशन घेऊ नका. कारण आता तुम्ही मतदार कार्ड अगदी ऑनलाइन स्वरूपात डाउनलोड करू शकता. जर तुम्ही मतदार झाला नसेल तर तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.

तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट असतील फक्त त्यांनाच निवडणुकीत मतदान करता येते. त्यामुळे जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. तसेच तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही, मतदार कार्ड डाऊनलोड करणे, नवीन मतदार कार्ड बनवणे अशे सर्व कामे ऑनलाइन करता येतात.

मतदार यादीतील नाव कसे तपासायचे? :

– तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव ऑनलाइन तपासू शकता. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://electoralsearch.eci.gov.in/

– तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक टाकावा लागेल.

– जर तुम्हाला EPIC क्रमांक माहित नसेल तर दुसरा पर्याय निवडा, तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि शोधा.

Download Voter ID Card l मतदार कार्ड कसे डाउनलोड करावे? :

– मतदार कार्ड डाउनलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा https://voters.eci.gov.in/ या पोर्टलवर जा.

– ‘E-EPIC डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.

– तुमचा EPIC क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक टाका.

– ‘OTP विनंती करा’ वर क्लिक करा.

– यानंतर तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल.

– OTP प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.

– तुमचे e-EPIC (डिजिटल वोटर कार्ड) डाउनलोड केले जाईल.


Quick View

[Best 8] Apps Like ThopTV In India Download – Free TV Streaming in 2021 | Mobile : Click here


Top 5 Apps To Recover Your Deleted Photos: Click here


Best Smartphones Under 15000 Rupees: Click here


Join LiveDeals Whatsapp Group
Join LiveDeals Telegram Channel
Visitor Online

Scroll to Top